गिरणगावातील मराठी कुटुंबाचा प्रश्न सोडवू

April 5, 2010 3:18 PM0 commentsViews: 1

5 एप्रिलगिरणगावातील 323 मराठी कुटुंबाचा प्रश्न सहानुभूतीने सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिले आहे. आमदार मधू चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. म्हाडाच्या शिवडी, परळ, करी रोड, लोअर परेल आणि दादर या ठिकाणी काही सोसायट्यांमधे 323 मराठी कुटुंबांना म्हाडाने घरे दिली होती. या सर्व घरांच्या स्टॅम्प ड्युटीही त्यांनी भरलेल्या आहेत.तरीही म्हाडाने या सर्व कुटुंबांना घरे सोडायला सांगितली. हा विषय सभागृहात उपस्थित झाल्यानंतर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी उत्तर दिले. पण विरोधकांचे समाधान न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.आज अधिवेशनात आणखी कोणकोणत्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली ते पाहूया…निकृष्ट दर्जाच्या प्रोटीन्स खरेदीची चौकशीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आभियानाअंतर्गत 37 लाखांचे निकृष्ट दर्जाचे प्रोटीन्स खरेदी केले गेल्याचे सरकारने मान्य केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचसोबत सर्व संबधितांना निलंबित करण्यात आल्याचेही आरोग्य राज्यमंत्री फौजीया खान यांनी विधान परिषदेत घोषित केले.कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणारकोयना धरण बांधून आता 50 वर्षे झाली. तरीही या प्रकल्पाला जमीन दिलेल्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. येथील गावांच्या विकासावर परिणाम होत आहे. या धरणाला जागा देणार्‍यांना शेतीसाठी पाणीही वापरता येत नाही. त्याला उत्तर देताना नारायण राणेंनी येत्या तीन वर्षात सर्व पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासने दिले.विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्नशालेय विदर्यांथ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिसांमार्फत103 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा गृहमंत्र्यांनी केली . ही हेल्पलाईन मंगळवारपासून सुरू करण्यात येईल. गुटखा उत्पादकांवर गुन्हा दाखल होणारगुटख्यामधील मॅग्नेशिअम काबोर्नेटची भेसळ करणार्‍या गुटखा कंपनीच्या मालकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी विधान परिषदेत दिले.

close