इमारतीवरुन कुत्र्याला खाली फेकणार्‍या तरुणांना अटक

July 6, 2016 5:44 PM0 commentsViews:

man-dog_759

06 जुलै : इमारतीच्या छतावरून कुत्र्याला खाली फेकण्याचा क्रूरपणा केलेल्या चेन्नईतील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईमधील एका तरुणाने इमारतीच्या छतावरून कुत्र्याला खाली फेकल्याचा व्हिडिओ मंगळवारी समोर आला होता. व्हिडिओमध्ये या तरुणाने कुत्र्याची मान पकडून त्याला छतावरून खाली फेकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून या 2 तरुणांच्या निघृण प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. एका नेटिझनने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देखील केली. पोलिसांनी व्हिडिओ फुटेजची माहिती घेऊन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करून त्यांना शोध सुरू केला. त्यानंतर आज दुपारी व्हिडिओमध्ये दिणार्‍या व्यक्तीला आणि हा व्हिडिओ शूट करणार्‍या त्याच्या साथिदाराला पोलिसांनी अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा