शहापूरच्या गोकुळगाव आंबिवलीची आश्रमशाळा भरते कोंबड्यांच्या खुराड्यात

July 6, 2016 6:03 PM0 commentsViews:

उमेश जोशी, शहापूर
06 जुलै : शहापूर तालुक्यात कोंबड्यांच्या खुराड्यात आदिवासी विकास प्रकल्पाची शाळा भरवली जाते. शहापूर तालुक्यातील गोकुळगाव आंबिवली इथं ही आश्रमशाळा आहे. ही शाळा चक्क रिकाम्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये भरवली जातेय. या शाळेत जवळपास साडेतीनशे आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेला स्वतःची इमारत नसल्यानं 2008 पासून कोंबड्यांच्या खुराड्यात ही शाळा भरवली जाते. सुरुवातीला शाळेला इमारत बांधण्यासाठी स्वतःची जागा नव्हती. आता जागा मिळाली पण इमारत बांधणीसाठी निधी नाही. एकट्या याच आश्रमशाळेची अशी अवस्था नाहीये, तर तालुक्यातील 14 आश्रम शाळांना अजूनही परिपूर्ण इमारत नाही आहे.

Adivasi Shala

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पातलली ही गोकुळगांव आंबिवली आश्रमशाळा..2008 पासून ही शाळा भाड्याने घेतलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सुरू आहे. आजही जवळपास 350विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकत आहेत. या शाळेला स्वत:ची जागा नव्हती त्यामुळे निधी मिळत नव्हता. प्रयत्न करून 2013ला जागा उपलब्ध झाली तर आता निधी मिळत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय यांचा मेळ नसल्याने विद्यार्थ्याना पूर्ण भिंत नसलेल्या पोल्ट्रीत शिकावं लागतं. ही मुलं इथेच शिकतायेत आणि इथेच जेवून इथेच झोपतायत. याबाबत शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांना विचारणा केली असता त्यांनी सरकारी उत्तर दिले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहापूर तालुक्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आबाळ होत आहे. शिर्थी आज ही त्यांच्या हक्काच्या सोई सुविधायुक्त शिक्षणापासून वंचित आहेत. सरकार पैसा खर्च करत पण प्रत्यक्षात असलेली ही भयाण वास्तवता पहाता आदिवासी विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण व हक्काचा निवारा मिळेल का? या प्रश्नच उत्तर आजतरी अस्पष्ट आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा