कर चुकवेगिरी प्रकरणी लिओनेल मेस्सीला 21 महिन्यांचा तुरुंगवास

July 6, 2016 7:56 PM0 commentsViews:

Messi2106 जुलै : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपूट पाच वेळा गौरवण्यात आलेल्या बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला कर चुकवेगिरी प्रकरणात स्पेनमधील एका  कोर्टाने 21 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

कोर्टाने 21 महिन्यांच्या शिक्षेसह मेस्सीला 2 मिलियन यूरो तर वडिल जॉर्ज यांना 1.5 मिलियन यूरो इतका दंड ठोठावला आहे. अर्थात स्पेनमधील कायद्यानुसार दोन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यास ती नजरकैदेत राहून भोगता येते. त्यामुळे मेस्सी आणि त्याच्या वडिलांना तुरुंगात जावं लागण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फुटबॉलमधून निवृत्ती घेणार्‍या अर्जेंटिनाच्या या माजी खेळाडूसह त्याचे वडील जॉर्ज यांना देखील कोर्टाने 21 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या विरोधात दोघांनाही स्पेनमधील सुप्रीम कोर्टात दाद मागता येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा