झाकिर नाईक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर

July 7, 2016 10:02 AM0 commentsViews:

zhakir_naik306 जुलै : देशात आणि देशाबाहेर इस्लामला कट्टर रूप देत त्याची भाषणं देणारे डॉ. झाकिर नाईक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.

ढाक्यामध्ये ज्या सहा दहशतवाद्यांनी ढाक्यात हत्याकांड घडवलं त्यातले काही जण झाकिर नाईक यांची अशी भाषणं ऐकूण प्रभावित
झाल्याचं उघड होतंय. अंजम चौधरी या दुसर्‍या एका इस्लामिक प्रचारकालाही या दहशतवाद्यांनी टीव्हीवर, सोशल मीडियावर फॉलो केल्याचं दिसतंय.

ढाक्यामध्ये दहशतवाद्यांनी 20 पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला. या दहशतवाद्यांनी एका पॉश कॅफेत प्रत्येकाचा धर्म विचारात नागरीकांची हत्या केली होती. हे दहशतवादी झाकिर नाईकच्या प्रभावाखाली असल्याचं उघड झाल्यामुळे झाकिर नाईक अडचणीत आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा