राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, भाजप 4, मित्रपक्ष 3 तर सेनेचे 2 जण घेणार शपथ

July 7, 2016 11:02 AM0 commentsViews:

07 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळालाय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (शुक्रवारी) होणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता, मंंत्रालयाच्या त्रिमुर्ती हॉलमध्ये शपथविधी होणार आहे. राज्यपालांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलंय. उद्या 9 जणांचा शपथविधी होईल अशीही माहिती मिळतेय यापैकी 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर दोघे जण शिवसेनेचे असतील असंही सांगितलं जात आहे.cm_fadanvis_vistar

मित्रपक्षातून सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे शपथ घेणार आहे. तर शिवसेनाकडे आमदार गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर यांची नावं जवळपास निश्चित झाली आहे. तर भाजपमधून पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सुरेश खाडे यांचं नाव निश्चित झाल्याची शक्यता आहे.

तर शिवाजीराव नाईक यांचं नावही आघाडीवर आहे. मराठवाड्यातून सुधाकर भालेराव, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावंही चर्चेत आहेत. तर विदर्भातून पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर यांची नावं आघाडीवर आहेत. तसंच उत्तर महाराष्ट्रातून जयकुमार रावल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे तर हरिभाऊ जावळेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे उद्या कोण कोण शपथ घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा