मंत्रालय नव्हे, झोपडपट्टी!

April 6, 2010 8:41 AM0 commentsViews: 23

6 एप्रिलजादा एफएफआयसाठी आघाडी सरकारने मंत्रालयालाची सहा मजली इमारत झोपडपट्टी म्हणून घोषित केली आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकराकडे पाठवण्यात आल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. मंत्रालय मेकओव्हरच्या नावाखाली 1.33 एफएसआयच्या ऐवजी 4 एफएसआय मिळावा म्हणून सरकारने मंत्रालय परिसराला झोपडपट्टी क्षेत्र घोषित केले आहे. तसा 30.10 चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी खडसे यांनी केली आहे. त्यावर मंत्रालयाला झोपडपट्टी घोषित करण्याच्या प्रस्तावाची माहिती घेऊन खुलासा करू असे मोघम उत्तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

close