मन हेलावून टाकणारं दृश्य, हत्तीणीच्या मृत्युमुळे पिल्लाला रडू कोसळलं

July 7, 2016 1:19 PM0 commentsViews:

07 जुलै : आईची माया जेव्हा पोरकी होती तेव्हा काय होतं याचं मन हेलावून टाकणार दृश्य कॅमेर्‍यात कैद झालंय. आणि हे दृश्य आहे एका लहानश्या गजराजाचं…coimbatore elephant 2

कोईंबतूरच्या जंगलात एक 30 वर्षीय हत्तीणीचा आजारामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे तिचं पिल्लू तिला उठवण्यासाठी गयावया करत होतं. डोळ्यात अश्रू आणि आईची साद ऐकण्यासाठी या पिल्लाची धडपड पाहून उपस्थितीचं मन हेलावून गेलं. मृत आईच्या शेजारी तब्बल सात तास हे पिल्लू घुटमळत होतं. वनअधिकार्‍यांनी या पिल्लाला दूर सारण्यासाठी प्रयत्न केला, त्याला खाण्यास दिलं. त्याला आईपासून दूर नेण्यासाठी हर तर्‍हेने प्रयत्न केले. पण, मातृशोकामुळे या पिल्लाची धडपड सगळ्यांनाच हेलावून टाकणारी होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा