कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही – आमिर खान

July 7, 2016 6:26 PM0 commentsViews:

Aamir-Khan-at-Dangal-poster-launch-678x381

07 जुलै : कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, एखाद्या धर्माचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो, असं बॉलिवूड अभिनेता आमिर खानने म्हटलं आहे.

ईदच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आमिर खान बोलत होता. कोणताही धर्म हा दहशतवाद शिकवत नाही. दहशतवाद आणि धर्माचा संबंध लावला जाऊ नये. मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन धर्मातील प्रत्येकजण आपल्या धर्मासाठी काहीतरी करत असतो. दहशतवादाशी त्यांचा काही संबंध नसतो. धर्म दहशतवाद शिकवत नाही. जे लोक दहशतवाद पसरवितात आणि जे लोक दहशतवाद करतात त्यांना धर्माशी काही देणं-घेणं नसतं. मग ते कोणत्याही धर्माचे असो. जर त्यांनी धर्माचं खरोखर पालन केलं असते तर त्यांनी प्रेम शिकवले असतं, असं तो म्हणाला.

बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांच्या रडारावर डॉ. झाकिर नाईक यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आमिर म्हणाला, मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला जे काही बोलायचे होते ते मी बोललो आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा