गोष्ट एका आदर्श लग्नाची! वायफळ खर्च टाळून ‘त्यांनी’ विद्यार्थ्यांना दिला मदतीचा

July 7, 2016 8:56 PM0 commentsViews:

07 जुलै : संजय शेंडे, अमरावती

विवाह सोहळा म्हटलं की बँडबाजा वरात-घोडे असा सगळा डामडौल असतो. मात्र अमरावतीमध्ये पार पडलेला एक विवाह सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला आहे. लग्नात होणार्‍या खर्चाची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय आयकर विभागात उपायुक्त अभय देवरे आणि आयडीबीआय बँकेत मॅनेजर असलेली प्रीती कुंभारे यांनी घेतला आहे. त्यांच्या लग्नाची ही एक आदर्श गोष्ट…

Amrawati lagna21
विद्युत रोषणाई, शामियाना, मानपान आणि पंच पक्वान्न असे लग्नसोहळे तुम्ही आम्ही अनेक पाहिले असतील. समाजातला मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्नसोहळ्यांवर लाखोंची उधळपट्टी केल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मोठेपणाचे हे असे सोहळे समाजाला काय देतात? असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काहीच नाही असं येतं. मग हे चित्र प्रत्यक्ष कृतीतून बदलण्यासाठी अमरावतीतील देवरे आणि कुंभारे कुटुंबीयांनी एक आदर्श निर्णय घेतला. उच्चशिक्षित असलेल्या अभय आणि प्रीतीनं शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. म्हणूनच त्यानी लग्नासाठी होत असलेला वायफळ खर्च टाळून तेच पैसे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी दिले आहेत.

समाजाचं आपण देणं लागतो आणि ते विसरून चालणार नाही, असं मत अभयच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे. लग्न आणि वाढदिवस साजरे करणारे अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र साधेपणानं लग्न करून सामाजिक भान राखणारे अभय आणि प्रीतीसारखी जोडपं तरुणाईसाठी खरा आदर्श आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा