चंद्रपूरमधील वीजनिर्मिती होणार ठप्प

April 6, 2010 10:42 AM0 commentsViews: 2

6 एप्रिलपाण्याअभावी 15 मे पासून चंद्रपूरमधील वीजनिर्मितीच 7 पॉवर युनीट बंद होणार आहेत. यामुळे 2 हजार 340 मेगावॅट वीज निमिर्ती बंद होणार आहे. पाणी नसल्याने यासंबंधीचा रिपोर्ट महानिर्मितीने तयार करून राज्याच्या उर्जा विभागाला दिला आहे. वीजनिर्मीतीसाठी चंद्रपूरच्या इरई धरणातील पाणी वापरले जाते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने इथे पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.डिसेंबर महिन्यात वरोरा येथील चारगाव धरणाचे 10 लाख घनमीटर पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात आले होते. चंद्रपूर वीज निमिर्ती केंद्रात 7 संच आहेत. याबाबत आता उर्जा मंत्री अजित पवार यांनी 8 एप्रिलला बैठक बोलावली आहे.

close