लोकमतच्या दिवाळी अंकाचं पुण्यात प्रकाशन

October 14, 2008 7:18 AM0 commentsViews: 11

14 सप्टेंबर, पुणे – ' मराठी भाषेची कवाडं सगळ्यांसाठी उघडली पाहीजेत. मराठीतलं दर्जेदार साहित्य इतर भाषांमध्ये गेलं पाहिजे तसंच इतर भाषांतलं दर्जेदार साहित्य मराठीत आलं पाहीजे ' असा सूर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि श्रेष्ठ गीतकार गुलजार यांनी व्यक्त केला. निमित्त होतं यंदाच्या लोकमत दिपोत्सव या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचं. लोकमतच्या दिपोत्सवचं प्रकाशन पुण्यात झालं. या अंकांचे गेस्ट एडिटर आहेत कवी गुलजार. कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात सर्जनशील असणार्‍या गुलजार आणि माशेलकर या दोन दिग्गजांची भाषेविषयीची मतं उपस्थितांना ऐकायला मिळाली. यावेळी पुणे लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, सल्लागार संपादक अनंत दीक्षित , आणि दीपोत्सव संपादक किशोर कुलकर्णी उपस्थित होते .

close