महापालिकेची थकीत पाणीपट्टी 915 कोटींवर

April 6, 2010 10:45 AM0 commentsViews: 1

6 एप्रिलमुंबई महापालिकेच्या पाणी बिलाची एकूण थकबाकी 915.76 कोटींवर पोहोचली आहे. यापैकी राज्य सरकारच्या विभागाकडची थकबाकी- 48.42 कोटी, म्हाडाकडे 147 कोटी रुपयांची थकबाकी आहे.केंद्र सरकारच्या विभागाकडची थकबाकी आहे, 184.12 कोटी. खाजगी ग्राहकांकडचे 537 .51 कोटी रुपयांच यात समावेश आहे. तर ठाणे पालिकेचे पाणी बील थकबाकी आहे, 65.74 लाख रुपये. राज्य सरकारची मुंबई महापालिकेकडे असलेली पाणी बील थकबाकीची रक्कम 306 कोटींवर पोहोचली आहे. राज्य सरकार आणि महापालिकेची एकमेकांकडे असलेल्या थकबाकीसाठी एक समिती नेमून थकबाकीची तडजोड करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

close