कोल्हापूर दोन दिवस पाण्याविना

April 6, 2010 11:00 AM0 commentsViews: 3

6 एप्रिलकोल्हापूर शहराला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. कारण बालिंगा उपसा केंद्राकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणार्‍या मुख्य पाईप लाईनला गळती लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेकडून या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पुढील दोन दिवस चालणार आहे. ए, बी, सी आणि डी वॉर्डासोबतच उपनगरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

close