खलबत संपली, आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

July 8, 2016 8:29 AM0 commentsViews:


fadanvis_mantralaya08 जुलै : अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची खलबत संपली असून चित्र आता स्पष्ट झालंय. भाजप, त्यांचे मित्रपक्ष आणि शिवसेना असे तिघांचे मिळून 10 जण आज मंत्रिपदाची शपथ घेतील. सध्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना बढती देत त्यांची कॅबिनेटपदी बढती करण्यात आलीये. ज्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून कार्यक्रमाची कल्पना दिली.

दरम्यान, शिवसेनेकडून कोण शपथ घेणार याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स राहिला. पण अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या गुलाबराव पाटील आणि जालन्याच्या अर्जुन खोतकर यांच्या नावाची मंत्रिपदासाठी अधिकृत घोषणा केली. आणि शेवटी आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं चित्रं स्पष्ट झालं.

मंत्रिमंडळ विस्तारातले 7 प्रमुख मुद्दे
- तरुण आणि अनुभवी नेत्यांना संधी
- राज्यमंत्र्यापैकी एकमेव राम शिंदेना कॅबिनेटपदी बढती
- शिवसेनेनं दोन्ही मंत्रिपदी ग्रामीण चेहर्‍यांना दिली संधी
- विदर्भाला झुकतं माप, दोन मंत्रिपदं
- पांडुरंग फुंडकरांसारख्या मातब्बर नेत्याचं पुनरागमन
- मित्रपक्षांना स्थान देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
- केंद्राप्रमाणे फडणवीस यांनी सेनेचं दबावतंत्र झुगारलं

- मंत्रिमंडळातील नवे चेहरे

-भाजप

1) मदन येरावार
-मतदारसंघ-यवतमाळ
-तिसर्‍यांदा आमदार
-नगरसेवक ते आमदारपदाचा टप्पा

2) जयकुमार रावल
-मतदारसंघ-सिंदखेडा (धुळे)
-तिसर्‍यांदा आमदार
-पक्षाचा उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा

3) पांडुरंग फुंडकर
-विधान परिषद सदस्य
-भाजपचे ज्येष्ठ ओबीसी नेते
-खासदार, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय

4) संभाजी पाटील निलंगेकर
-मतदारसंघ-निलंगा (लातूर)
-दुसर्‍यांदा आमदार
-तरुण नेतृत्व, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते

5) सुभाष देशमुख
-मतदारसंघ-द.सोलापूर
-दुसर्‍यांदा आमदार
-खासदार, प्रदेश उपाध्यक्षपद भूषवलं, सहकारमधलं मातब्बर नेतृत्व

6) रवींद्र चव्हाण
-मतदारसंघ-डोंबिवली
-दुसर्‍यांदा आमदार
-केडीएमसीत भाजपचं संख्याबळ वाढवल्याचं बक्षीस

7) राम शिंदे
-कॅबिनेटपदी बढती
-मतदारसंघ – कर्जत – जामखेड
-आमदारकीची दुसरी टर्म
-उत्तम कामगीरीमुळे बढती अभ्यासू
-प्रशासनावर उत्तम पकड

-शिवसेना

1) अर्जुन खोतकर
-मतदारसंघ- जालना
-आमदारकीची 4थी टर्म
-युतीच्या काळातही राज्यमंत्री

2) गुलाबराव पाटील
-मतदारसंघ – जळगाव ग्रामीण
-आमदारकीच्या 3 टर्म
-खडसेंचे कट्टर प्रतिस्पर्धी
 
 
-मित्रपक्ष

1) सदाभाऊ खोत
-विधान परिषद सदस्य
-प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
-ऊस, दूध आंदोलनाचा आक्रमक, रांगडा चेहरा

 
2) महादेव जानकर
-अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
-धनगर समाजाचे नेते
-लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना जेरीस आणलं
-पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा