शेतजमीन बळकावण्यासाठी आदिवासी कुटुंबाला मारहाण

July 8, 2016 12:09 PM0 commentsViews:

अंबरनाथ, 08 जुलै : आदिवासी शेतकर्‍यांची जबरदस्तीने जागा बळकावण्यासाठी आदिवासींना मारहाण केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडलाय. तालुक्यातील बोहणोली गावातील किसन शीद या आदिवासी शेतकर्‍याच्या शेतात 14 जून रोजी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीचे बांध,आळे तोडून या शेतकरी कुटुंबालाच प्रवीण पाटील,पंढरी पाटील, मंगेश पाटील ,चंद्रकांत पाटील आणि इतर 9 अशा 13 जणांनी या आदिवासांना जबर मारहाण केली होती.ambarnath

या मारहाणीत प्रकाश शीद,किसन शीद ,बाळाराम शीद आणि आदिवासी महिलांना लाठ्या काठ्या आणि लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. आता या घटनेला 25 दिवसांचा अवधी उलटला आहे. या मारहाणीत आरोपींवर पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र केवळ पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे आरोपींना 15 तारखेपर्यंत अटक पूर्व जमीन मिळाला आहे असा आरोप करीत या आदिवासी कुटुंबाने अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे या संपूर्ण आदिवासी कुटुंबाला मारहाण झाली असताना आदिवासी कुटुंबावरच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा