जळगावात गॅस्ट्रोची साथ

April 6, 2010 11:07 AM0 commentsViews: 1

6 एप्रिलजळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. महिंदळे गावात गॅस्ट्रोने दोन बळी घेतले आहेत. तर 8 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासन करत आहे. पण गॅस्ट्रोची लागण झालेल्या पेशंटची संख्या वाढतच चालली आहे. गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गॅस्ट्रोच्या साथीने दोन बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने कुटुंबांची तपासणी सुरू केली आहे.

close