IBN लोकमत इम्पॅक्ट : वनजमिनीची माहिती गोळा करण्याचे मुनगंटीवार यांचे आदेश

July 8, 2016 2:42 PM0 commentsViews:

mungantiwar08 जुलै : आयबीएन लोकमतने गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील वनजमिनींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. गेल्या 25 वर्षांत खुद्द शासनाचं 9 लाख 76 हजार हेक्टर वनजमिनींची खिरापत वाटल्याचा धक्कादायक रिपोर्ट आम्ही दाखवला होता. या बातमीची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गायब झालेल्या वनजमिनीची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील मूळ वनजमीन आणि त्यातून गायब झालेली वन जमीन यांचा शोध घेण्याचा आदेश मुनगंटीवार यांनी दिले आहे.
वनजमीन कोणाला दिली आणि कोणत्या नियमानुसार दिली याची चौकशीदेखील करण्यास सांगितलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील वन अधिक्षकांची आज संध्याकाळी पुण्यात बैठक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा