‘आयबीएन-लोकमत’ची यशस्वी दोन वर्षे

April 6, 2010 11:45 AM0 commentsViews: 110

6 एप्रिल'आयबीएन-लोकमत'ला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. निर्भिड पत्रकारितेचा वसा जपत 'आयबीएन-लोकमत'ने आत्तापर्यंतची वाटचाल केली आहे. यापुढेही समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सत्य आणि विश्वासार्हतेच्या जोरावर 'आयबीएन-लोकमत'ने आज दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षात पत्रकारितेमध्ये एक वेगळा इतिहास निर्माण करण्याचेच काम आम्ही केले. सामाजिक प्रश्नांसोबतच राजकीय प्रश्न माध्यमाच्या या व्यासपीठावर मांडताना आम्ही नेहमीच निःपक्ष राहिलो. मांडले ते जनतेचे प्रश्न. जनसामान्यांच्या आवाजाला आम्ही बळ दिले.जनतेचा आवाज सरकारी दरबारी पोहचवलाच नाही, तर त्यावर निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले. हे श्रेय केवळ आमचे नसून यात तुमचा सर्वांचा मोठा सहभाग आहे. पत्रकारितेचा निभिर्ड बाणा जपणारे एकमेव मराठी न्यूज चॅनेल, असे बिरूद मिरवताना आम्हाला अभिमान वाटत आहे. बातमीमागचे राजकारण उलगडण्याचे आम्ही प्रयत्न केला. विकास कामांना गती का मिळत नाही, याचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. लोकांचा पैसा कुठे जातो, याचा मागोवा घेऊन सरकारला त्याबद्दल जाब विचारला. सामाजिक विषयाची बांधिलकी जपत समाजाच्या विविध स्तरांतील प्रश्नांना आम्ही वाचा फोडली.विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतीलस रणसंग्राम दाखवत मराठी न्यूज चॅनेलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या राजकारणाचा वेध घेतला. पण आमची बांधिलकी राहिली जनतेशी. 'माझं मत माझं सरकार' या माध्यमातून आम्ही जनतेचा आवाज सत्ताधार्‍यांपर्यंत पोहचवला. 'जनतेच्या जाहीरनाम्या'साठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि तो जाहीरनामा आम्ही थेट राज्यपालांनाच सादर केला.समाजाचे प्रश्न सोडवताना आम्ही हल्लेही पचवले.पर्यावरणासारख्या गंभीर विषयांवरही आम्ही समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला. मायनिंग आणि औष्णिक वीजप्रकल्पांमागच्या बातम्या देताना आम्ही मांडले सत्य आणि सत्यच.राज्यात उसळलेल्या दंगलीच्या काळात आम्ही दुभंगलेली मने जोडण्याचेच काम केले. बेळगावमध्ये मराठी भाषिकांची होत असलेली परवडही आम्ही तितक्याच प्रकर्षाने मांडली. वसईकरांच्या आंदोलनाच्या न्याय्य बाजूचे वार्तांकन करत, त्यांच्यावर होत असलेला अन्याय आम्ही दाखवून दिला. सरकारला त्यावर निर्णय घ्यायला भाग पाडले.महाराष्ट्राची कला संस्कृतीही आम्ही जपली. रंगभूमीला वाहिलेला नवा कार्यक्रम 'नाटक -बिटक' खास नाट्यरसिकांसाठी सुरू केला. तरुणाईच्या बुद्धिमत्तेला साद घालणारा 'टेक गुरु ' हा कार्यक्रमांच्या यादीतील नवा पैलू. समाजातील अनेक विषयांची उकल करणारा आमचा खास कार्यक्रम 'रिपोर्ताज'ला 'लाडली' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांमुळे यंदाच्या मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात 'आयबीएन-लोकमत'ने तब्बल सहा पुरस्कार पटकावत रेकॉर्ड ब्रेक केला. प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद हीच आमची शक्ती आणि प्रेरणाही…आणि म्हणूनच आहे. 'आयबीएन-लोकमत' सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज चॅनेल…''अचूक बातमी ठाम मत, पाहा फक्त 'आयबीएन-लोकमत'!''आदिवासी विद्यार्थ्यांनी केला वाढदिवस साजरा'आयबीएन-लोकमत'चा वाढदिवस सातपुड्यातील आदिवासींनी आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी साजरा केला. पारंपरिक ढोल, ताशाच्या गजरात आणि गुळाची जिलेबी वाटत या आदिवासींनी हा वाढदिवस साजरा केला.'आयबीएन-लोकमत'ने समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली. म्हणूनच आमचे हे चॅनल लोकप्रिय झाले आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात राहणार्‍या पावरा समाजाच्या प्रश्नांना आम्ही वाचा फोडली. सरकारला त्यांच्या प्रश्नांची नोंद घ्यायला लावली. एवढेच नाही तर त्यांच्या परंपरांचे वेगळे दर्शन घडवले. वसतीगृहाची अवस्था सरकारसमोर मांडली. आणि या मुलांवरच्या अन्यायाला वाचा फोडली. म्हणूनच ते आमच्या या आनंदात सहभागी झाले.

close