26/11तील अतिरेक्यांचे दफन

April 6, 2010 1:14 PM0 commentsViews: 1

6 एप्रिल मुंबईवर 26/11 रोजी हल्ला करणार्‍या 9 अतिरेक्यांच्या मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सभागृहात नक्षलवाद, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू असताना या अतिरेक्यांचे मृतदेह जानेवारीतच दफन केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमच्यावर हल्ला करणार्‍यांना इथल्या मातीतच गाडू, असा संदेश आम्ही या निमित्ताने दिला आहे, असे गृहमंत्री म्हणाले. एकूण 10 अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यापैकी 9 अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले होते. तर शहीद तुकाराम ओंबळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जीवावर उदार होऊन 10वा अतिरेकी अजमल कसाब याला पकडले होते. पुराव्यासाठी हे 9 मृतदेह जतन करण्यात आले होते. त्यासाठी मोठा खर्चही केला जात होता.मुंबईतील काही संघटनांनी हे मृतदेह भारतात दफन करण्यास विरोध केला होता. आवाहन करूनही पाकिस्तानने हे मृतदेह ताब्यात घेतले नव्हते.

close