खड्‌ड्यातही युती? मुंबईतल्या रस्त्यांवरून भाजप-सेनेमध्ये तू तू-मै मै सुरूच

July 8, 2016 10:10 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे, उदय जाधव, मुंबई
08 जुलै : मंत्रींमंडळाचा विस्तार आता आटोपलाय पण आता सेना भाजपात तु तू मै मै सुरूच आहे ती मुंबईच्या स्थितीवरून. दोन दिवसांपुर्वी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी गेल्या पंधरा वर्षात सेनेनं मुंबईचं वाटोळं केल्याचा घणाघाती आरोप केला. त्या आरोपावर शांत बसेल ती सेना कशी? उद्धव ठाकरेंनी आज सीएमच्या त्याच आरोपाला उत्तर दिलं. आठवून करून दिली की आपली सगळ्यातच युती आहे. अगदी मुंबईतल्या खड्‌ड्यांबाबतसुद्धा

êÖêËêÖêêopy

भाजप-सेनेचे सर्वोच्च नेते असे मुंबईवर भांडत असताना दुसरी फळी तरी मागं कशी राहील. मुंबईच्या महापौरांनी आज चक्क खड्‌ड्यांची पहाणी केली. पण काय त्यांची पहाणी, आंबेकरांनी पालिकेनं बांधलेलं खड्डे दिले सोडून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या त्यांनी पहाणी केली. त्यावर टीकाटिप्पणीही केली.

लोकांचे प्रश्न सोडवायचेत म्हणून मुंबईचा फार कुणाला पुळका आला असेल तर आपला अंदाज चुकू शकतो. सगळ्यांना खड्डे दिसतायत कारण मुंबई पालिकेची सत्ता सगळ्यांना खूणावतेय. त्यात डब्यात गेलेल्या राज ठाकरेंनाही खड्‌ड्यातून सत्ता मिळण्याची आशा दिसतेय. त्यामुळे मनसे कधी खड्‌ड्यांना हार तुरे घालतं, कधी त्यात झाडं लावतं तर कधी खड्‌ड्यांचा उत्सव साजरा करतं, तर कधी खड्‌ड्यांवरून कंत्राटदार, त्यांच्या माणसांना मारहाण करतं.

शिवसेना-भाजप खड्‌ड्यातून सत्तेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतंय..पण सध्याची खड्याची स्थिती पाहता मुंबईकरांनी कोणाला सत्ता द्यायचीय हे जरा लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे..कारण ह्या रस्त्यांवरून आपल्याला चालायचं आहे. साहेबी लोकांसारख्या मोठ्या गाड्या आपल्याकडं थोड्याच आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा