मुंबईत मनसेची गुंडगिरी सुरूच, कंत्राटदार सोडून कर्मचार्‍याला मारहाण

July 8, 2016 5:30 PM0 commentsViews:

sdfsasy

08 जुलै :  राज ठाकरेंच्या मनसेची गुंडगिरी आज (शुक्रवारी) मुंबईत बघायला मिळाली. खराब रस्त्याची पाहणी करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार कांदिवली पूर्व इथल्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

रस्त्याच्या खड्‌ड्याबाबत महापालिकेविरोधात आज मुंबईत मनसेने आंदोलन केलं. यादरम्यान, कांदिवली पूर्व परिसराचा विभाग अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी निकृष्ट दर्जाचं सामान वापरत असल्याचं सांगत कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण केली आहे.

दरम्यान, मुंबईतल्या खड्‌ड्यांविरोधात मनसेनं आज अनोखं आंदोलन केलं. मनसेनं मुंबईत ठिकठिकाणी सेल्फी आंदोलन केलं. यामध्ये मोठ्या संख्येनं मनसैनिकांनी सहभाग घेतला. शिवसेनेनं करुन दाखवले नसून खड्डे पाडून दाखवले असा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा