वैधानिक मंडळांना मुदतवाढ मिळणार

April 6, 2010 1:20 PM0 commentsViews:

6 एप्रिलवैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्याचे संकेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यास राज्यपालांच्या निर्देशानुसार प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिंचनावरून घोषणाबाजीसिंचनाच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदार आज विधानसभेत आमनेसामने उभे ठाकले. सिंचनाचा निधी विदर्भात पळविण्यात येत आहे, असा आरोप होताच विदर्भातील आमदारांनी त्याला विरोध करत घोषणाबाजी केली.वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ मिळावी अशी मागणीही विदर्भातील आमदारांनी केली.

close