नॅनोवर बनला म्युझिक अल्बम

October 14, 2008 7:20 AM0 commentsViews: 8

14 सप्टेंबर, राजस्थान – टाटांची नॅनो गुजरातला गेली असली , तरी काहींसाठी ती अल्बमचं इन्स्पिरेशन ठरलीय. राजस्थानमध्ये नॅनोवर म्युझिक अल्बम बनवलाय. त्याचं नाव आहे ' वन लॅक कार. ' सगळे जण वाट पाहतायत नॅनो कारची. पण टाटाच्या नॅनो कारवरचा अल्बम आधीच बाहेर आलाय. राजस्थान वाळवंटात या अल्बमनं आधीच वादळ निर्माण केलं आहे. या टाटाज् वन लॅक कार या अल्बममध्ये बार्मर आणि जेसलमरच्या मार्केटमध्ये कार आलीय, असं दाखवलं आहे, तसंच शेतकरी या म्युझिक अल्बमच्या मागे आहेत, असंही दाखवलं आहे.या म्युझिक व्हिडिओमध्ये एक स्त्री आपल्या नवर्‍याच्या मागे लागली आहे ती नॅनो खरेदी करण्यासाठी. म्हणजे ती त्याच्यासाठी शेतात जेवण घेऊन येईल आणि विहिरीवरून पाणीही भरेल. आता नॅनोवरचा हा व्हिडिओ तर हिट झालाय. पण नॅनोसाठी थोडा वेळ थांबावं लागणार आहे.

close