नाशिकमधल्या 35 पर्यटकांवर काश्मीरमध्ये हल्ला, स्थानिकांनी केली सुखरूप सुटका

July 9, 2016 3:09 PM0 commentsViews:

jk_nsk09 जुलै : नाशिकमधील पर्यटकांच्या गाडीवर काश्मीरमध्ये दगडफेक झालीये. यातील 35 पर्यटकांना काही जणांना जमावाने ओलीस ठेवले होते. नंतर स्थानिकांनीच या दंगलखोरांपासून या पर्यटकांची सुखरूपपणे सुटका केली. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडलीये.

काश्मीरमधील अवंती पूरा संगम येथे हा प्रकार घडला. हिज्बुल मुजाहिद्दीनचा नेता बुर्‍हान वानी हा सुरक्षा यंत्रणांकडून मारला गेल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ फुटीरतावादी संघटना आक्रमक झाल्यात. त्यामुळे काश्मीरमध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालं. वानीच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी झालेल्या उग्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आज काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा