नक्षली हल्लात 75 जवान शहीद

April 6, 2010 1:45 PM0 commentsViews: 4

6 एप्रिलछत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 75 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सुरुंगाचा वेध घेणारी सीआरपीएफची गाडीच उडवून दिली. सकाळी सहा ते सात वाजता हा हल्ला झाला. जखमींना हलवण्यासाठी घटनास्थळावर हेलिकॉप्टर पाठवण्यात आल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले. सीआरपीएफचे जवळपास 40 जवान दंतेवाडा जिल्ह्यातील सुकमा येथील तडेमेटला जात होते. ऍन्टी लँडमाईन वाहनात हे सर्वजण निघाले होते. त्याच वेळी माओवाद्यांनी लँडमाईन बॉम्बस्फोट घडवला. इथे अजूनही नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे.जवळपास 1 हजार नक्षलवाद्यांनी या जवानांना घेरले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधून सीआरपीएफची जादा तुकडी घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी मागितली माफीदरम्यान या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी माफी मागितली आहे. नक्षलवाद्यांशी लढणार्‍या जवानांच्या मदतीसाठी कुमक पाठवल्याची माहितीही चिदंबरम यांनी दिली. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 7 रेसकोर्सवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी, रॉचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन या बैठकीत उपस्थित आहेत.महाराष्ट्रात हाय अलर्टछत्तीसगडमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. गोदिंया जिल्ह्यातील देवरी या छत्तीसगडच्या सीमेलगतच्या गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ही सीमा सील करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांवर एक नजर टाकूयात…29 जून 2008 : ओरिसातील बालिमेलात बोटीवर हल्ला, 38 सुरक्षा जवान शहीद16 जुलै 2008 : मलकनगिरीत सुरुंग स्फोट, 21 पोलीस शहीद13 एप्रिल 2009 : कोरापूट जिल्ह्यात खाणीवर हल्ला, 10 जवान शहीद22 एप्रिल 2009 : माओवाद्यांनी केले ट्रेनचे अपहरण22 मे 2009 : गडचिरोलीतील हल्ल्यात 16 पोलीस शहीद8 ऑक्टोबर 2009 : लाहेरी पोलीस ठाण्याजवळ हल्ला, 17 पोलीस शहीद15 फेब्रुवारी 2010 : पश्चिम मिदनापूरमध्ये माओवादी हल्ला, इस्टर्न फ्रंटियर रायफल्सचे 24 जवान शहीद4 एप्रिल 2010 : कोरापूट जिल्ह्यात सुरुंग स्फोट : विशेष नक्षलविरोधी पथकाचे 11 जवान शहीद

close