होय, आमच्यावर झाकिर नाईक यांचा प्रभाव, आयसिसमधून परतलेल्या आरिफची कबुली

July 9, 2016 3:57 PM0 commentsViews:

09 जुलै : कल्याणमधून आयसिसमध्ये भरती होण्यासाठी गेलेल्या चार तरुणांवरही झाकिर नाईक यांचा प्रभाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. सीरियातून परतलेल्या आरिफ माजिद या तरुणानं एनआयकडे ही कबुली दिलीये. आयसिसमध्ये भरती झालेल्या आरिफला एनआयएननं सीरीयातून भारतात आणलंय. त्याच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आलीये.

arifदोन वर्षांपूर्वी कल्याणमधील आरिफ माजिद आणि त्याचे तीन मित्र आयसीसमध्ये सहभागी होणासाठी इराकमध्ये गेले होते. हे चारही तरूण सहा महिन्यांनंतर भारतात परतले. यातील आरिफ माजिदला एनआयएने ताब्यात घेतले. त्याची उलटतपासणी केली असता आपण आणि आपले मित्र हे झाकीर नाईक यांच्या प्रभावाखाली होतो अशी कबुली दिलीये. त्याच्या कबुलीमुळे नाईक यांच्या अडचणीत वाढ झालीये.

एवढंच नाहीतर औरंगाबाद शस्त्रसाठ्यातला आरोपी फिरोज देशमुख हा झाकीरचा परिचित असल्याचं समोर आलंय. फिरोज झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या लायब्ररियनचं काम पाहायचा. या शस्त्रसाठ्याप्रकरणात अबु जुंदालही आरोपी आहे. या शिवाय फिरोज देशमुखचा आणखी एक मित्र राहील शेख हा एटीएसच्या रडारवर असून सध्या तो पाकिस्तानात असल्याची माहिती आहे.

तर झाकीर नाईक यांचे लागेबांधे नक्की कुणासोबत आहेत याचा तपास करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना नुकत्याच दिल्यात. मात्र असं असलं तरीही त्यांच्या मोठ्या बहिणीचे पती मुबारक कापडी यांनी त्यांच्या संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.मुबारक हे स्वतः झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या चॅनलचे प्रवक्तेही आहेत. एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकून कुणी दहशतवादी बनला तर त्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार कसं धरणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा