गांधींना उतरवलेल्या रेल्वेतून मोदींचा प्रवास

July 9, 2016 5:19 PM0 commentsViews:

09 जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. डरबन ते प्रिटोरिया असा रेल्वे प्रवास त्यांनी आज केला. या प्रवासासोबत महात्मा गांधी यांच्या आठवणी ताज्या झाल्यात. 1893 रोजी याच गाडीतून प्रवास करताना महात्मा गांधींना कृष्णवर्णीय असलेल्या कारणावरून गाडीतून बाहेर काढण्यात आलं होतं. आज त्याच गाडीतून त्याच मार्गावर प्रवास करून मोदींनी महात्मा गांधींच्या आयुष्यातील या आठवणीला उजाळा दिलाय. या मार्गावरून प्रवास करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा