व्यापार्‍यांचा आडमुठेपणा, बाजार समित्यांमध्ये पुन्हा शुकशुकाट

July 9, 2016 5:34 PM0 commentsViews:

nashik_bazar_samitiनाशिक, 09 जुलै : व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजारसमित्यांमधील व्यवहार ठप्प झाले आहे. सरकारनं शेतकर्‍यांना शेतमाल थेट विक्री करण्याचा अधिकार दिल्यानं हा व्यापार्‍यांवर अन्याय असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

बाजार समित्यांमध्ये दररोज होणार्‍या लिलावावर व्यापारी, हमाल-मापाडी अशा अनेकांना रोजगार मिळतो. पण, शेतकर्‍यांना शेतमाल थेट विक्री करण्याचा अधिकार देऊन सरकारने थेट शेतकर्‍यांना सरकारनं आम्हाला बेरोजगार करायचं ठरवलं आहे का ? असा प्रश्न व्यापारी संघटनेनं उपस्थित केलाय. पण व्यापार्‍यांच्या या बेमुदत बंदमुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी शेतक र्‍यांचीही मागणी आहे. जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये रोज होणारी 300 ते 350 कोटींची उलाढाल मात्र या तिढ्यामुळे ठप्प झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा