पावसाळ्यासाठी मॉक ड्रील

April 6, 2010 1:55 PM0 commentsViews: 1

6 एप्रिलपावसाळ्याला अजून तीन महिने अवकाश आहे. पण मुंबईकरांनी पावसाळ्यात होणार्‍या पूरस्थितीचा सामना कसा करावा, यासाठी महापालिकेने एक मॉक ड्रील आयोजीत केले. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या किंग सर्कल ब्रीजखाली हे मॉक ड्रील पार पडले. हा भाग लो लाईन एरियात आहे. त्यामुळे पावसाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरते. त्यावेळी उद्भवणार्‍या पूरस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण आज महापालिकेने दिले. या मॉक ड्रीलमध्ये फायर ब्रिगेड आणि पोलीसही सामील झाले होते.

close