‘राजगृह’ द्या, ‘संविधान’ घ्या’, आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

July 9, 2016 8:42 PM0 commentsViews:

09 जुलै : संविधान बंगला मागणार्‍या प्रकाश आंबेडकरांनी अगोदर त्यांचा राजगृह बंगला द्यावा अशी प्रति मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलीय.athavale_on_ambedkar3

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर याांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आठवलेंच्या बंगल्याची मागणी केली होती. त्याला आठवलेंनी आज आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे उत्तर दिलंय. विशेष म्हणजे आठवले मंत्री झाले त्यादिवशी प्रकाश आंबेडकरांनी कोण आठवले ? असा प्रश्न उपस्थिती करून आठवलेंना टोला लगावला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा