मनमोहना अल्बम लाँच

April 6, 2010 2:01 PM0 commentsViews: 4

6 एप्रिलगायक सुरेश वाडकर यांच्या पत्नी पद्मा वाडकर यांच्या मनमोहना या म्युझिक अल्मबचे मुंबईत लाँचिंग झाले. अभिनेते नाना पाटेकर यांनी हे लाँचिंग केले. सुरेश वाडकर यांच्या आजीवासन म्युझिक स्टुडिओमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला अनेक दिग्गज जमले होते. संगीतकार रवींद्र जैन, अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर यांनी यावेळी पद्मा वाडकर यांना त्यांच्या मनमोहना या अल्बमबद्दल शुभेच्छा दिल्या. या अल्बममध्ये एकूण 8 गाणी आहेत. आणि या अल्बमला मयुरेश पै यांनी संगीत दिले आहे.

close