कब्बडी स्पर्धेत डॉ. शिरोडकर क्लबची बाजी

April 6, 2010 2:09 PM0 commentsViews: 204

6 एप्रिलआंबेवाडी क्रिडामंडळ आयोजित ऑल इंडिया कब्बडी स्पर्धेत महिला गटात डॉ. शिरोडकर स्पोर्टस् क्लबने तर पुरुष गटात बीएसएफ संघाने विजेतेपद पटकावले. हिरकमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेली ही स्पर्धा अभ्युदय नगर येथील भगतसिंग मैदानावर पार पडली. या स्पर्धेत भारतातील नामवंत संघानी भाग घेतला होता. सलग पाच दिवस चाललेल्या स्पर्धेला क्रिडाप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवत फायनलमध्ये महिला गटात शिरोडकर टीमने कर्नाटक पोलीस महिला संघाचा 25-20 असा पराभव केला. तर पुरुष गटात बीएसएफने सीआरपीएफ संघाचा 18-14 असा पराभव करत अजिंक्यपद मिळवले. विजेत्या संघास प्रत्येकी 1 लाख रुपयांचे इनाम तर उपविजेत्या संघास प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

close