पंकजा मुंडे-तावडेंचे पंख छाटले, राम शिंदेंकडे जलसंधारण; पाटलांकडे महसूल !

July 9, 2016 11:01 PM0 commentsViews:

09 जुलै : राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना जोरदार दणका दिलाय. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेलं जलसंधारण, रोहयो खातं आणि विनोद तावडेंकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं काढून घेण्यात आलंय. जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलंय. तर गिरीश महाजनांकडे वैद्यकीय शिक्षण खातं देण्यात आलंय. तर भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. खातेवाटप जाहीर करून मुख्यमंत्री रशियाच्या दौर्‍यावर रवाना झाले आहे.cm_khate_watap3433

अखेर 36 तासांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा खातेवाटप जाहीर झालाय. चिक्की घोटाळा आणि ‘सेल्फी’मुळे जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि पदवीमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे वादात सापडले होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या खातेवाटपात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना चांगलाच दणका दिलाय. दोन्ही मंत्र्यांचे खाती काढून घेण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडील 2 खाती काढण्यात आलीये. आता राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते सोपवण्यात आलंय. तसंच जयकुमार रावल यांच्याकडे रोहयो आणि पर्यटन खातं सोपवण्यात आलंय.

कोकणात नारायण राणे यांना शह देण्यासाठी दीपक केसरकर यांच्याकडे ग्रामीण गृहराज्यमंत्रीपद सोपवण्यात आलंय. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याकडील रिक्त झाली खाती नवनिर्वाचित मंत्र्यांकडे सोपवण्यात आलीये. पांडुरंग फुंडकर यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. ठरल्याप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले आहे. याबदल्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्याकडील सहकार आणि पणन खातं सोडलंय. सहकार आणि पणन खात्याची जबाबदारी सुभाष देशमुख यांच्यावर सोपवण्यात आलीये. कॅबिनेटपदाची लॉटरी लागलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे कामगार कल्याण खातं सोपवण्यात आलंय.

नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर

 

चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम, महसूल
पांडुरंग फुंडकर – कृषीमंत्री, राम शिंदे – जलसंधारण
ibnlokmat.tv

गिरीश महाजन – जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण
चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा आणि उत्पादन शुल्क
ibnlokmat.tv

सुभाष देशमुख – सहकार आणि पणनमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर – कामगार कल्याण
ibnlokmat.tv

जयकुमार रावल – रोहयो आणि पर्यटन मंत्री
महादेव जानकर – पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
ibnlokmat.tv

दीपक केसरकर – गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
मदन येरावार – ऊर्जा, पर्यटन, सा.प्रशासन (राज्य)
ibnlokmat.tv

सदाभाऊ खोत – कृषी, पणन (राज्यमंत्री)
गुलाबराव पाटील – सहकार (राज्यमंत्री)
अर्जुन खोतकर – पशु आणि दुग्ध (राज्यमंत्री)
रवींद्र चव्हाण – बंदरे आणि आरोग्य (राज्यमंत्री)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा