टांझानियात पंतप्रधान मोदींनी घेतला नगारे वाजवण्याचा आनंद

July 10, 2016 5:42 PM0 commentsViews:

10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर असून, ते आज (रविवारी) टांझानियात दाखल झाले आहेत. मोदींनी आणि टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मुगुफुली यांच्यासोबत नगारा वाजवण्याचा आनंद लुटला.

Narendra Modi231

रात्री उशिरा मोदी डरबनहून टांझानियात दाखल झाले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली आहे. मोदींच्या स्वागतासाठी जुलियस न्येरेरे विमानतळावर एका विशेष कलाकारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारंपरिक पद्धतीने मोदींचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, नगारा वाजवण्यापूर्वी मोदींनी तिथल्या लहान मुलांशीही संवाद साधला.

पंतप्रधान मोदी तिथल्या 50 हजार भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते नैरोबी आणि केनियाकडे रवाना होणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा