अंधेरीत ब्लाइंड चेस टुर्नामेट

April 6, 2010 2:14 PM0 commentsViews: 7

6 एप्रिलऑल इंडिया ब्लाइंड चेस टुर्नामेट अंधेरीच्या स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतातील अव्वल चेसपटूंनी सहभाग घेतला आहे. नॅशनल बी स्पर्धेतून अव्वल स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेत चुरस पाहायला मिळत आहे. GTL फाऊंडेशने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेची फायनल शनिवारी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील अव्वल 4 स्पर्धकांना ऑगस्टमध्ये होणार्‍या सरबिया येथील वर्ल्ड चाम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.

close