पंकजा मुंडेंचा यु टर्न, दुसर्‍या लोकांना मंत्रिमंडळात संधी मिळाली तर मला अभिमानचं

July 11, 2016 1:22 PM0 commentsViews:

Pankaja Munde14

11  जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे सोपवलं. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यानंतर लगेचच पंकजा मुंडेंनी फेसबुकवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इतरांना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे?? असं पंकजा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. माझ्या जिल्ह्यातील लोकं तसेच पत्रकार माझ्या बातम्या, फोटो अपेक्षित ठेवतील म्हणून तिथे न जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पंकजा मुडेंनी फेसुबकवर लिहिलं आहे की,

मी नम्र विनंती करते, कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. मी इंडोनेशिया हून आज सिंगापूरला पोहोचले. देशाबाहेर असल्याने मी tweet केले . इथे वर्ल्ड वाॅटर लिडर समिट साठी मला निमंत्रित केले होते. नुकत्याच झालेल्या खाते बदलानंतर आपण जलसंधारण मंत्री नसताना जाणे मला जरा अयोग्य वाटले. माझ्या जिल्ह्यातील लोकं तसेच पञकार माझ्या बातम्या, फोटो अपेक्षित ठेवतील म्हणून न जाण्याचा निर्णय मी twitter वरून जाहीर केला. मला सिंगापूरकडुन निमंत्रण होते म्हणून मी आले होते.

सर्वच नविन मंत्री अभिनंदनास पात्र आहेत. माझे निकटवर्तीय राम शिंदे व जयकुमार रावल यांना माझ्याकडील खाती दिली गेली, याचा मला आनंद आहे. त्या दोघांचे मी ट्विटरवरून अभिनंदन देखील केले. जलयुक्त शिवार आता Peak वर आहे व ते Mission म्हणून व Passion म्हणूनही ते स्विकारतील असे विश्वास दाखवणारे स्टेटमेंट केले … त्याना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे??
त्या दोघांना शुभेच्छा!!! त्यांचं मनोबल वाढेल असचं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि मी ते करणारच…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा