‘सैराट’च्या यशानंतर इंदापूरला मिळाली नवी ओळख!

July 11, 2016 3:11 PM0 commentsViews:

 

11 जुलै :  मधुकर गलांडे, इंदापूर

ग्रामीण ढंगाच्या संवादाने सैराट चित्रपट यशाच्या शिखरावर गेला. सैराट चित्रपटाच्या यशानंतर आता ग्रामीण भागात चित्रपट निर्मितीची लाट आली आहे. गावागावात, तालुक्याच्या ठिकाणी आता कॅमेरा…रोल…ऍक्शन.. हे आवाज आता कानी पडू लागले आहेत.

Indapur23
निर्माता ग्रामीण… कलाकार ग्रामीण… संवाद ग्रामीण… मंग आता सिनेमा सुपरहीट होणारच… त्यात इंदापूरात तर आता कॅमेरा…. रोल… ऍक्शनचा आवाज तर रोजच घुमतोय.

ग्रामीण जिवनावर आधारीत सैराट चित्रपट रिलीज झाल्यावर त्याने 85 कोटींचा बिझनेस केला. त्यामुळेच गावागावांमधल्या तरूणांमधला दिग्दर्शक जागा झाला आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन कमी खर्चात चित्रपट करणं, हा आता एक व्यवसायचं झाला आहे. इंदापूर तालुक्यातील समीर निकम हा सर्वसामान्य घरात जन्माला आलेला तरूण आता “येडं प्रेम”, या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक झाला आहे. ग्रामीण भागातील संवगड्यांना घेऊन तो एका चित्रपटाची निर्मिती करतोय.

ग्रामीण भागातील निर्माता आणि दिग्दर्शकांमुळे नव्या कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळत असल्याने लोक या लाटेरवर स्वार झाले आहेत. चित्रपट कसा तयार करतात आणि त्याला किती मेहनत लागते याची माहिती काढून आता गावाकडच्या मंडळींनी सिनेनिर्मितीला सुरूवात केली आहे.

आपल्याला सुध्दा नागराज मंजुळेंप्रमाणे यश मिळणारच अशी आशा प्रत्येकजण उराशी बाळगून आहे. आता स्थानिक पातळीवर बनलेले हे सिनेमे ताकिटबारीवर यशस्वी होतात का त्यावरच ही लाट किती काळ कायम राहिल ते अवलंबून आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा