सर्जनशिलतेचा सवाई महोत्सव

April 6, 2010 3:18 PM0 commentsViews: 3

राजेंद्र हुंजे, पुणेसर्जनशिल संगिताचे व्यासपीठ म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव. सवाई गंधर्व महोत्सवाचे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या संगीत क्षेत्रात एक स्थान आहे. महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना सवाईने 58 वर्षे पूर्ण केली आहेत.सवाई गंधर्व महोत्सव 1952मध्ये सुरू झाला. पण या महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक वेगळी सांगितीक चळवळ उभी राहिली.हा महोत्सव हळूहळू महाराष्ट्राचे सांगितीक अधिष्ठान बनत होता. दरम्यानच्या काळात पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व आणि जितेंद्र अभिषेकींनी संगीत घराघरात रुजवले.गुरुप्रती असलेल्या एका कृतार्थ भावनेने उभा राहिलेला महोत्सव म्हणजे सवाई गंधर्व संगीत महोत्सव. इथे गायला मिळणे हे कुठल्याही गायकासाठी मोठ्या प्रतिष्ठेची बाब. उमद्या कलाकारांसाठी नवे दालन उघडून देण्यासाठी सवाईच्या व्यासपीठाने नेहमीच भूमिका वठवली.जयपूर आणि किराणा घराण्याचा अपवाद वगळता, महाराष्ट्रात कुठलेही संगीत घराणे नव्हते. पण त्याचा वारसा जपत या क्षेत्रात महाराष्ट्राने स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यात सवाई गंधर्व महोत्सवाचे मोठे योगदान आहे.गेली 58 वर्ष हा महोत्सव सातत्याने सुरू आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीविना अशी सांगितीक चळवळ चालवणे तसे कठीणच. पण या महोत्सवात गानरसिक दरवर्षी न्हाऊन निघतात.सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या रुपाने कलाक्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण झाली, याची आठवण महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने झाल्याशिवाय राहत नाही.

close