नादखुळा पावसामुळे कोल्हा’पूर’मय !

July 11, 2016 6:44 PM0 commentsViews:

कोल्हापूर, 11 जुलै : जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या संततधारेनं नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. तसंच पंचगंगा नदीही पात्राबाहेर पडली आहे.kolhapur_44

जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 190.5 मि. मी. पावसाची नोंद झालीये. तर राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होवून धरणाची पाणीपातळी 4. 41 टीएमसीवर गेलीय. तर वारणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होवूनन् 16. 50 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून,राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी 35 फूट 11 इंचावर गेलीये. त्याशिवाय पंचगंगा नदीवरील सात बंधारेही पाण्याखाली गेलेत. तसंच जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 49 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी 18 घरांचे नुकसान झाले आहे. बहुचर्चित कळंबा तलावही आता 45 टक्के भरलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच पहायला मिळतय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा