नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आले नागोबा !

July 11, 2016 6:51 PM0 commentsViews:

11 जुलै : नाशिकमध्ये दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. या पुरात नदीकाठी असलेले साप वाहून आले आहे. रामकुंड परिसरात अनेक साप आढळून आले आहे. रामकुंड परिसरातून सर्पमित्रांनी आत्तापर्यंत 12 साप पकडले आहे.

nashik_snekगोदावरी नदीला कालपासून पूर आलाय. पुराच्या पाण्यात वाहून आलेले साप रामकुंड परिसरातल्या दुकानं आणि घरात शिरलेत. याबाबत लोकांनी सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीनं या सापांना पकडलंय. पक़डलेले साप कोब्रा आणि धामण जातीचे असल्याचं सांगण्यात येतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा