धनंजय मुंडेंना फरार आरोपी घोषित करण्याची शक्यता

July 11, 2016 8:05 PM0 commentsViews:

d_munde342311 जुलै : बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी औरंगबाद हायकोर्टाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पोलिसांचा हा प्रस्ताव हायकोर्टाने मंजूर केला तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पोलिसांना फरार आरोपी म्हणून घोषित करत येणार आहे.

या प्रस्तावित फरार आरोपी यादीमध्ये धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 42 जणांचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 147 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कर्ज घोटाळ्याप्रकरणी मागील महिन्यात 30 जूनला बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंची एसआयटीनं चौकशी केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही चौकशी झाली होती. तब्बल अडीच तास धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यासह आमदार अमरसिंह पंडित यांचीही चौकशी करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा