सोलापुरात भाजपमध्ये देशमुख विरुद्ध देशमुख वाद उफाळला

July 11, 2016 11:01 PM0 commentsViews:

 सागर सुरवसे, सोलापूर – 11 जुलै : सुभाष देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर सोलापूर भाजपमधील देशमुख विरुद्ध देशमुख वाद उफाळलाय. सुभाष देशमुखांना कॅबिनेट दिलंय. तर राज्यमंत्री विजय देशमुखांची खाती कमी करण्यात आली. त्यामुळे देशमुख विरुद्ध देशमुख अशी जुंपण्याची शक्यता आहे.solapur333

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुभाष देशमुख आणि विजय देशमुख या दोन मंत्र्यांमध्ये उभा वाद निर्माण झालाय. सोलापुरात
देशमुख- देशमुख पक्के वैरी असं चित्र निर्माण झालंय. सुभाष देशमुखांच्या निमित्तानं सोलापूरला कॅबिनेटमंत्रिपद मिळालं. मात्र त्याचवेळी राज्यमंत्री विजय देशमुखांची खाती कमी करण्यात आली. त्यामुळे सोलापूर भाजपमध्ये नाराजी आहे. सुभाष देशमुखांच्या स्वागतासाठी एकदुसरा वगळता कोणीही फिरकलं नाही. फक्त लोकमंगलचे कर्मचारीच त्यांच्या स्वागताला दिसत होते.

निवडणुकीत 17 हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद आणि 70 हजार मताधिक्यानं निवडून आलेल्या राज्यमंत्र्यांच्या खात्यांना कात्री हा न्याय कसा? असा सवाल विचारला जातोय. सोलापूर महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात. या निवडणुकीसाठी विजयकुमार देशमुखांसोबत काम करू अशी ग्वाही सुभाष देशमुखांनी दिलीय. एका पक्षात एकाच मंत्रिमंडळात असतानाही दोघं एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. या दोघांचा संघर्ष भाजपच्या आणि सोलापूरच्या विकासाच्या मूळावर येण्याची भीती व्यक्त केली जातेय.

भाजप कार्यकर्त्यांचा सवाल?
 निवडणुकीत 17 हजारांच्या मताधिक्यानं निवडून
आलेल्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद आणि
 70 हजार मताधिक्यानं निवडून आलेल्या
राज्यमंत्र्यांच्या खात्यांना कात्री हा न्याय कसा?
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा