बाराखडी न आल्याने पित्याकडून चिमुकलीची हत्या

July 12, 2016 1:08 PM0 commentsViews:

Aur Crime

12 जुलै : औरंगाबाद जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बाराखडी येत नाही म्हणून एका पित्याने पोटच्या मुलीची हत्या केली आहे. औरंगाबादच्या बाळापूर गावात घटना रविवारी रात्री ही दुदैर्वी घटना घडली आहे. भारती कुटे असं मृत मुलीचे नाव आहे.

पहिलीत शिकणार्‍या मुलीला बाराखडी येत नाही, म्हणून संतापलेल्या पित्याने मुलीच्या तोंडात कांदा कोंबून तिचा खून केला. त्यानंतर परस्परच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मुलीची आईने याबाबत चिखलठाणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी आरोपी राजेश कुटेला खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा