खडकवासलातून 2 हजार क्‍युसेक्‍सने पाणी सोडलं

July 12, 2016 4:40 PM0 commentsViews:

Khadakwasla

12  जुलै : पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला धरण आज (मंगळवारी) सकाळी 9 वाजता 92 टक्के भरल्यामुळे धरणातून 2 हजार 80 क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरवात झाली असून आज दुपारी तीननंतर 4 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे.

पानशेत, वरसगाव, टेमघर धरणातून पाणी सोडलं नसतानाही पाणलोट क्षेत्रातील झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण भरलं आहे. या परिसरात 328 मिमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. एका दरवाज्यातून 416 क्युसेसेक्स याप्रमाणे धरणातून एकूण 2080 क्युसेक्स पाणी सोडलं आहे.

खडकवासलात 1 जुलै रोजी 1.47 टीएमसी पाणीसाठा धरणात शिल्लक होता. आज सकाळी चारही धरणात मिळून सकाळी सहा वाजता 11.58 टीएमसी म्हणजे 39.72% पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा म्हणजे शहराला 290 दिवस पुरेल एवढे पाणी जमा झालं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा