रस्ते घोटाळा : बीएमसीच्या दोन कंत्राटदारांना अटकपूर्व जामीन मंजूर

July 12, 2016 4:58 PM0 commentsViews:

assignment-name-in-brief_260861d0-447d-11e6-80db-dfffb1de8362

12 जुलै : रस्ते घोटाळा प्रकरणी दोन कंत्राटदारांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जीतेंद्र किकावत आणि मनीष कासलीवाल यांना 1 लाखांचा जामीन मंजूर झाला आहे. तसंच, मुंबईतील या घोटाळा प्रकरणाची चौकशी एसीबीकडे देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने आपलं म्हणणं दोन आठवड्यात मांडावं, असे आदेश आज मुंबई हायकोर्टानं दिले.

मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं हा आदेश दिला आहे. त्रयस्थ लेखापालांना अटक करुन कंत्राटदारांना मात्र रस्ते घोटाळ्यात अभय मिळालं आहे असा गुप्ता यांचा आक्षेप आहे. तसंच ज्यांनी या कंपन्यांना कंत्राटं दिलीत त्यांची भूमिकाही या प्रकरणात समोर आली पाहिजे आणि तशी चौकशी एसीबीच करु शकते असा युक्तिवाद गुप्ता यांनी केला आहे. तर पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत असं म्हणणं सरकारने कोर्टासमोर मांडलं. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 2 आठवड्यांनंतर होणार असून त्यावेळी सरकार आणि बीएमसी या दोघांनाही आपलं उत्तर हायकोर्टात सादर करायचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा