मुंबईतला बायोमेडिकल कच-याचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर

October 14, 2008 7:20 AM0 commentsViews: 7

14 ऑक्टोबर, मुंबई – बायोमेडिकल वेस्ट फेकण्यासाठी ,वापरण्यात येणार्‍या प्लॅसिस्टकच्या पिशव्यांची किंमत, वाढवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. त्यासंबंधीचं टेंडरही काढण्यात आलं आहे. नोव्हेंबर महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू होणार आहे. पण याचा भुर्दंड पेशंटच्या हॉस्पिटलच्या बिलावर पडणार आहे.'आजपर्यंत आम्ही 17 हॉस्पिटल्सना प्रॉसिक्युशनच्या नोटीसा दिल्यात आणि 21 हॉस्पिटल्सना क्लोजरच्या नोटीसा दिल्यात..त्यानंतर त्यांनी कम्प्लायन्स केला,' असं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच एमपीसीबीचेसदस्य सचिव संजय खंदारे यांनी सांगितलं.बायोमेडिकलवेस्टसंदर्भात लॅस्टिकच्या पिशव्यांच्या खर्चाचा वाद सध्या मुंबईत गाजत आहे . या पिशव्या बीएमसीच्या कंत्राटदारकडूनच खरेदी करायच्या,असं बंधन हॉस्पिटल्सवर आहे. पण पर्यावरण दक्षता मंचाचे जनरल सेक्रेटरी विद्याधर वालावलकर यांचं असं म्हणणं आहे – बायोडिग्रेडेबल पिशव्यांची खरं तर काहीच गरज नाही आहे. कारण आपण डीप बरीयल करत नाही. त्यासाठी गरज आहे ती 'कॉमन फॅसिलिटी केंद्र' ची.' कारण ठाण्यामध्ये बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावणारं 'कॉमन फॅसिलिटी केंद्र' विद्याधर वालावलकर गेली तीन वर्षं यशस्वीपणे चालवत आहेत. पण मुंबईत मात्र बीएमसी पिशव्यांच्या किंमती वाढवते पण बायोेमेडिकल वेस्टच्या विल्टेवाटीचं कॉमन सेंटर काही सुरू करत नाही, हीच तरी शोकांतिका आहे.

close