मुंबईतील खड्‌ड्यांबाबतचा आयुक्तांचा दावा ठरला खोटा, ‘IBN लोकमत’चा रिऍलिटी चेक

July 12, 2016 7:46 PM0 commentsViews:

12  जुलै : मुंबईत अजून पावसाने अद्याप आपलं रौद्र रूप दाखवलं नसलं तरिही रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज चंद्रावर गाडी चालवल्याचा अनुभव घ्यायला मिळतोय.

यंदा मुंबईकरांना पाठीचं दुखणं सतावणार नाही असा मुंबई महानगरपालिकेचा दावा केंव्हाच फोल ठरला आहे. त्यात भरीस भर म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी मुंबईत फक्त 87 खड्डे असल्याचा अजब दावा केला आहे.

तर पुण्याच्या रस्त्यांवर खड्डे कि खड्‌ड्यांमधे रस्ता हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. अजित पवारांनी उद्धाटन केलेल्या स्वारगेट पुलावर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा