सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

April 7, 2010 8:58 AM0 commentsViews: 3

7 एप्रिलपुण्याचे दिवंगत समाजसेवक सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. एका याचिकेवर मुंबई हायकोर्टाने तसा आदेशच दिला आहे. शेट्टी यांच्या भावाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास आपली संमती असल्याचे हायकोर्टाला कळवले आहे.राज्याच्या अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न विरोधकांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना विचारला होता. त्यावर गरज पडल्यास हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाईल, असे गृहमंत्र्यांनी म्हटले होते.पण आता खुद्द हायकोर्टाने याबाबतचे आदेश दिल्याने आता या प्रकरणाचा तपास यापुढे सीबीआय करणार आहे.

close