राज्यातील कुपोषणाचं दाहक वास्तव, गेल्या 10 वर्षांत कुपोषणात दुप्पट वाढ!

July 12, 2016 9:34 PM0 commentsViews:

malnutrition_0191d

12  जुलै : पालन पोषण आहार योजनेवर करोडो रुपये खर्चूनही राज्यात कुपोषित बालकांची संख्या काही केल्या कमी होत नाही. मग या कुपोषित बालकांचा आहार नक्की जातो तरी कुणाच्या घशात असा सवाल आता निर्माण झाला आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे क्रमांक मध्ये कुपोषणासंबंधीचं दाहक वास्तव समोर आलं आहे. या सर्वेमध्ये महाराष्ट्रातल्या कुपोषणाचं प्रमाण गेल्या 10वर्षात दुप्पट झाल्याचं आढळून आलं आहे.

गडचिरोलीत 100 मुलांमागे 21 मुलं कुपोषित आहेत. तर महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा तीव्र कुपोषण या कॅटगरीत पहिल्या तीनमध्ये मोडतोय. बीड जिल्ह्यात 100 मुलांमागे 17 मुलं कुपोषित आढळून आली आहेत. तर राज्यातील 14 जिल्हे अतितिव्र कुपोषण म्हणजेच रेड झोन मध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभाग नक्की करतो तरी काय असा सवाल उपस्थित होतोय.

आता जरा आकडेवारीच्या माध्यमातून पाहुयात राज्यातील कुपोषणाचं वास्तव

राज्यातील कुपोषणाचं दाहक वास्तव

 • 10 वर्षांपूर्वी कुपोषणाचं प्रमाण 5.2
 • चालूवर्षी कुपोषणाचं प्रमाण 9.40
 • गेल्या 10 वर्षांत कुपोषणात दुप्पट वाढ!
 • करोडोंचा पोषण आहार गेला कुठे?
 • कुपोषण निर्मूलनासाठी 9 योजना कार्यान्वित
 • कुपोषण निर्मूलनासाठी ICDS विभाग करतो काय?

अतितीव्र कुपोषणग्रस्त जिल्हे

 • गडचिरोली – 21.3 टक्के
 • चंद्रपूर – 17.3 टक्के
 • बीड – 17.1 टक्के
 • वाशिम – 15.3
 • नंदुरबार – 15.3
 • यवतमाळ -14.5
 • गोंदिया – 13.4

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा